Saturday, March 18, 2017

Maharashtrian Farmers

जय महाराष्ट्र

 महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा व थोर मोठ्या मोट्या लोकांचा वारसा लाभलेले राज्य.

कर्ज माफी व महाराष्ट्राचा शेतकरी. खरच अवघड समीकरण आहे. ज्या वेळेस निवडणूका असतात त्या वेळेस सरकार कुठले कुठले आश्वासने देतात.
महाराष्ट्रातील शेतकरी हा आज हवाल दिल झाला आहे. उत्तरप्रदेश च्या राजकारणात ज्या वेळेस घोषणा केली जाते आम्हला सत्ता द्या आम्ही सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी करू त्या वेळेस माझा महाराष्ट्रातील शेतकरी अपेक्षेने वाट बघतो अरे महाराष्ट्रात हि तुमचीच सत्ता आहे मग कर्ज माफी का नको. का फक्त राजकारणापुरतीच घोषणा बाजी असते का?.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कर्ज माफी देऊ तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची शाश्वती द्या. 

माननीय मंत्री महोदय शेतकरी आत्महत्या करणार नाही ह्याची शास्वती सगळेच देतील परंतु त्या साठी खालील प्रश्नाचे उत्तरे द्या. 

१) अवकाळी पाऊस पडणार नाही याची शास्वती द्या. 
२) वेळेवर पाऊस पडेल याची शास्वती द्या. 
३) पाऊस शेतीच्या पिकाच्या प्रमाणात पडेल याची शास्वती द्या. 
४) पिकांनची नापीक टाळण्यासाठी व उत्पादने वाढण्यासाठी योग्य भावात खते मिळेल  याची शास्वती द्या. 
५) प्रत्येक शेतकऱ्याचे होणारे नुकसानि विमा सरकार काढेल याची शास्वती द्या. 
६) शेती बियाणे व मजुरी खर्च कमी होईल याची शास्वती द्या. 
७) सरकारी धोरणामुळे पिकाला न मिळणार हमीभाव सरकार ने भरून द्यावा याची शास्वती द्या. 
८) जास्त उत्त्पानामुळे होणारे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान जो माल मार्केट पर्यंत पण घेऊन जाण्यासाठी परवडत नाही अश्या नौकासांची भरपाई देणे याची शास्वती द्या. 
९) शेतीती काबाड कष्ट करून सुद्धा दिवसाची कमीत कमी मजुरी तरी शेतीमाल मागे निघाली पाहिजे याची शास्वती द्या. 


असो अशे असंख्य  प्रश्न आहेत परंतु सरकार ला जे दिसते ते फक्त म्हणजे शेतकरी कर्जं